Shirdi Airport
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी विमानतळाचा नाईट लँडिंग चा मुद्दा विधानसभेत मांडला यावेळी बोलताना ते म्हणाले,
शिर्डी एअरपोर्ट हे आपल्या महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी चांगली होण्याच्या दृष्टीने आपण पावले उचलावी लागतील. जास्त चांगली कनेक्टिविटी आपण केली पाहिजे. शिर्डी हे एक मोठे तीर्थस्थान आहे आणि शिर्डी विमानतळावर एके वेळी दिवसभरात 14 विमाने येत होती. त्या 14 पैकी दक्षिण भारतातून जास्त येत आहेत काही दिल्लीतून सुद्धा येत आहेत. ही विमानतळ तर महाराष्ट्रात करिता एक महत्त्वाचे कनेक्टिव्हिटी साधन निर्माण झाले आहे.
शिर्डी मध्ये नाईट लँडिंग करिता 7 एप्रिल ला ट्रायल झाली आणि ती यशस्वीरित्या पार पडली. परंतु आज चार महिने झाल्यानंतर सुद्धा नाइट लॅंडिंग सुरू झालेली नाही. नाईट लँडिंग एकदा सुरू झाली तर पार्किंग करता सुद्धा तिथे सुविधा करता येईल. त्यातून तुमचे प्राधिकरणा चे उत्पन्न सुद्धा वाढू शकते इतकी मदत होऊ शकते. नाईट लँडिंग का थांबली हे खरंतर समजत नाही असा प्रश्न ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.
दोन-तीन वर्षापासून नाईट लँडिंग साठी प्रयत्न चालू आहे तरीसुद्धा थांबलेले हे काही फार ठीक वाटत नाही. लवकरात लवकर नाइट लॅंडिंग ची सुविधा निर्माण करणं हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. महा-आघाडी सरकार असताना आपण 150 कोटी रुपये तिथल्या टर्मिनल करता आणि सुविधा करता आपण त्याला दिले होते. पन ते काम सुद्धा थांबलेल दिसतय.
सध्याला शिर्डी टर्मिनल मध्ये जागा खूप कमी पडलेली आहे, त्यामुळे तिथे जत्रा भरल्यासारखं दिसते, त्यासाठी टर्मिनल तातडीने मोठे करणे गरजेचे आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
शिर्डी चं नाईट लँडिंग च्या संदर्भात त्यानी पर्मिशन आपल्याला दिली आहे. आता सुद्धा नाईट लँडिंग चालू आहे, परंतु प्रत्येक नाईट साठी प्रत्येक वेळेस परमिशन घ्यावी लागते. पण आता लवकरच रेगुलर परमिशन आपल्याला भेटून जाईल त्यासाठी सर्व पूर्तता करण्यात आली आहे.
तसेच टर्मिनल बिल्डिंगचाही टेंडर काढण्यात आलं असून त्यासाठी 650 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्याचे काम येत्या दोन-तीन महिन्यात सुरु होईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सर्व पॅसेंजर ची गैरसोय होत आहे. टर्मिनल बिल्डिंग चे काम होईपर्यंत तात्पुरता होल्डिंग एरिया तयार करू ज्यामुळे पॅसेंजर ची गैरसोय होणार नाही.