Type Here to Get Search Results !

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता येणार

 

pm-kisan-yojana, pm-kisan-14th-installment, pm-kisan-14th-kist, pm-kisan-14th-installment-date, pm-kisan-yojana-marathi,


PM Kisan Yojana: 

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत असते. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते या योजनेचा 14 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात  जमा होणार आहे. पी एम किसान सन्मान योजना अंतर्गत ही पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. 

    या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी चार महिन्याला दोन हजार रुपयांचा एक हप्ता दिला जातो अशा प्रकारे शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपये सरकार तर्फे आर्थिक मदत मिळते आणि या मदतीची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे तर बघूया कधी जमा होणार पुढील हप्ता.

 कधी  मिळणार PM किसान योजनेचा १४ वा हप्ता 

PM किसान योजनेअंतर्गत मागील १३ वा हप्ता २७ फेब्रुवारीला जमा करण्यात आला होता. तसेच १४ वा हप्ता लवकरच जमा होणार असून त्याची संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. . तर 14 वा हप्ता 28 जुलै 2023 रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

   येणारा  हप्ता शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून दोन हजार रुपये तसेच राज्य शासनाकडून सुद्धा दोन हजार रुपये मिळणार आहेत. असे केंद्र आणि राज्य सरकार चे मिळून एकाच वेळी शेतकऱ्याला ४ हजार रुपये मिळणार आहेत. 

 PM KISAN योजनेचा लाभ घेण्यासाठी KYC बंधनकारक

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी ही KYC करणे बंधनकारक आहे जर शेतकऱ्यांनी ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर ही केवायसी करणे गरजेचे आहे अन्यथा 14 लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. 

KYC करण्यासाठी खालील पद्धतीने स्टेप्स फॉलो करा

  1. सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल.
  2. त्यानंतर e-KYC हा पर्याय निवडावा.
  3. e-KYC या बटनावर क्लिक करावे  व तुमच्या आधार क्रमांक टाकावा.
  4. यानंतर आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकावा व सबमिट बटणावर क्लिक करावे
  5. सबमिट झाल्यानंतर केवायसी ची प्रक्रिया पूर्ण होईल.

 पी एम किसान हेल्पलाइन नंबर 

  • 011-24300606
  • 155261

 हेल्पलाइन नंबर वर संपर्क करून तुम्ही पीएम किसान योजनेविषयी अधिक माहिती मिळू शकतात किंवा काही अडचण किव्वा तक्रार असल्यास सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. 

JOIN WHATS APP GROUP

Whats-app group joining link

https