चंद्रयान 3 चंद्रावर कधी पोहोचेल?
चंद्रयान 3 च प्रक्षेपण श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी झालेल आहे. या चंद्रयानला चंद्रावर पोचण्यासाठी सुमारे 40 दिवसांचा कालावधी लागणार आहे. 40 दिवस पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच 23 किंवा 24 ऑगस्ट ला चंद्रयान चंद्रावर उतरेल. या कालावधीमध्ये काही अडचण आल्यास 23 किंवा 24 ऑगस्ट या तारखांमध्ये बदलही होऊ शकतो, असे भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो कडून सांगण्यात आले आहे.
चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार
चंद्रयान ला पृथ्वीपासून चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी 40 दिवसांचा कालावधी लागणार. पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा संपूर्ण प्रवास सुमारे 3.84 लाख किलोमीटरचा असणार आहे सर्व काही इस्रोच्या नियोजनाप्रमाणे पार पडलं तर चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅन्डरचे लँडिंग होईल. चंद्रयान 2 मध्ये ही लँडिंग होण्यासाठी भारताला अपयश आले होते. चंद्रयान २ नंतर तब्बल चार वर्षानंतर चंद्रावर जाण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था प्रयत्न करत आहे.
चंद्रयानाचा ४० दिवसांचा प्रवास :
- सर्वात पहिल्यांदा चंद्रयान-3 लॉन्चर आणि रॉकेटला अंतराळात नेले जाईल. यावेळी चंद्रयान 3 पृथ्वीला सहा प्रदक्षिणा घालणार आहे.
- सहा प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर चंद्रयान 3 मार्ग बदलून पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडणार आहे व त्यानंतर प्रत्यक्ष चंद्राकडे प्रवास सुरू होईल
- त्यानंतर चंद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत पाठवले जाईल.
- चंद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर आपली कक्षा 100 किलोमीटर पर्यंत हळूहळू वाढवेल.
- नंतर चंद्रयान चे प्रोफेशनल मॉडेल आणि चंद्र मॉडेल एकमेकांपासून वेगळे होतील
- त्यानंतर त्यानंतर चंद्रयान बुस्ट होईल आणि त्याचा वेग कमी होईल.
- चंद्रयानाची प्रि लँडिंग होईल
- चंद्रयान प्रत्यक्षात चंद्रावर लँड होईल
- चंद्रयानाची लेंडर आणि रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचतील व त्यांची कार्य सुरू होईल.