PM Pik Vima YoJana In Maharashtra -
प्रधानमंत्री पीक विमा २०२३ योजना संपूर्ण भारतात राबविण्यतात येणार आहे. या पीक विमा योजनेला "प्रधानमंत्री फसल बिमा योजना 2023" असे नाव दिले आहे. हि योजना आपल्या संपूर्ण भारत देशातली सगळ्या राज्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. " शेतीचे रक्षण करणे " हे प्रधानमंत्री फसल बिमा योजनेचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. या योजनेमध्ये भारतातील सर्व शेतकरी सहभागी होऊ शकतात. या योजनेची संपूर्ण माहिती घेण्याकरिता हा लेख शेवट पर्यंत वाचा.
- खरीप हंगामातील या योजनेत कोणती पिके आहेत
- अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे उद्देश कोणते
- तसेच शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक
या सर्व प्रश्ननांची उत्तरे मिळविण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा .
प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना केवळ १ रुपयात आपल्या पिकाचा विमा काढता येणार आहे. तसेच विम्याची उर्वरित रक्कम शेतकऱ्यांसाठी राज्यसरकार भरणार आहे. अतिवृष्टी, वादळी वारे तसेच चक्रीवादळामुळे होणारे नुकसान, ओला दुष्काळ, विविध कीटकांचा प्रादुर्भाव अशा प्रकारच्या विविध नैसर्गिक आपत्ती पासून शेजाऱ्यांना आर्थिक सहायता देण्यासाठी सरकार कडून पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक :
पीक विमा योजना २०२३ चा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने https://pmfby.gov.in या वेबसाईटवर अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलै 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे. प्रधानमंत्री पीक विमा २०२३-२४ च्या हंगामासाठी तसेच २०२५-२६ पर्यंत खरीप व रब्बी हंगामासाठी राबविण्यात येणार आहे. अशा प्रकारे एकूण तीन वर्ष हि योजना असणार आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रमुख उद्दिष्ट्ये :
१. शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी, गारांचा पाऊस , वादळी वारे तसेच चक्रीवादळ,ओला दुष्काळ, विविध कीटकांचा प्रादुर्भाव होणे तसेच पिकांना अचानकपणे रोग येणे या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास जातो त्यामुले त्याला हातभार लावणे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
२. शेतीची नुकसान झालेली असताना अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्याचे मनोबल राखणे.
३. बहुतांश शेतकरी पिकांची नुकसान झाल्यास, आत्महत्येचा पर्याय निवडतात त्यापासून बचाव करणे.
४. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यान्ना विविध प्रकारे अर्थीक सहाय्यता करणे तसेच विविध तंत्रज्ञान वापरण्यासाठी सहकार्य करून शेतकऱ्यास शेती करण्यास प्रोत्साहित करणे, हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना खरिपाच्या विविध १४ पिकांची नोंद करता येणार :
प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना खरीप हंगामातील १४ विविध पिकांसाठी शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार आहे. यामध्ये विविध अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके तसेच नगदी पिकांचा देखील समावेश करण्यात आला आहे. या सर्व प्रकारच्या पिकांसाठी विमा संरक्षण मिळनार आहे. यामध्ये खरिपाचा कांदा, सोयाबीन ,कापूस ,ज्वारी , बाजरी, भात ,उडीद , मूग, नाचणी, तूर, मका, भुईमूग, कारले, तीळ अशा एकूण १४ विविध पिकांची नोंद या योजनेत शेतकऱ्यांना करता येणार आहे. या सर्व पिकांसाठी विम्याची रक्कम राज्य सरकार कडून शेतकऱ्यांना मिळणार आहे.
प्रधानमंत्री पिक विमा काढण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालील प्रमाणे:
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- जमिनीचा डिजिटल सातबारा उतारा आणि ८ अ
- पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र
- सामायिक क्षेत्र असल्यास सामायिक सहमती पत्र
धन्यवाद !!!