Talathi bharati 2023
महसूल विभागातील तलाठी पदासाठी रिक्त पदे भरण्यासाठी पुन्हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना पुन्हा महसूल विभागातर्फे मदत वाढ देण्यात आलेली आहे. याआधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी 18/7/ 2023 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती.
राज्यामध्ये सुरू असणाऱ्या अतिवृष्टी तसेच वादळी वारे या कारणांमुळे उमेदवारांना अर्ज भरण्यास विविध अडचणी येत आहेत तसेच इंटरनेटची सुविधा या कारणांमुळे प्रभावित झाल्यामुळे काही अर्जदारांना अर्ज करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे अर्ज करण्यासाठी मुदत वाढविण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा कालावधी
दिनांक 22/7/2023 ते दिनांक 25/7/2023
या कालावधीत अर्जदारांनी आपला अर्ज सादर करून परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे. तलाठी भरतीसाठी उमेदवारांनी या आधी अर्ज सादर केला असल्यास पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळणार नसून या कालावधीतच उमेदवारांना अर्ज करण्याची आवश्यकता आहे.
Helpline No: 020-25712712