Kolhapur News
कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या गडमुडशिंगी गावात लहान मुले तलावा काठी खेळत असताना त्यांना तब्बल 24 लाखाची सोने सापडले. मुले खेळत असताना तलावाजवळ त्यांना एक प्लास्टिकची पिशवी मिळाली असता त्या पिशवीत सोन्याची नाणी व सोन्याची बिस्किट सापडली.
रोहित विश्वास गडकरी ऋषिकेश विश्वास गडकरी तसेच नागेश गवळी, सुभाष कांबळे ही मुले तळ्याजवळ खेळत होती. त्यांना ही सोन्याची बिस्किटे व नाणी सापडल्यानंतर त्या लहान मुलांनी सोन्याने भरलेली पिशवी पालकांकडे, विश्वास गडकरी यांच्याकडे दिली.
पोलिसांना या गडमुडशिंगी गावातील घटनेची कल्पना मिळताच त्यांनी या सर्व घटनेची चौकशी केली. हे सर्व सोन्याची नाणी व सोन्याची बिस्किट पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे यामध्ये दहा ग्रॅम सोन्याची चार बिस्किटे व पाच ग्रॅम सोन्याची दोन नाणी आढळली. हे सोनी नक्की कुणाची आहे याचा अद्यापही तपास लागलेला नाही, परंतु ही नाणी कुणाची याची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.