Emergency Alert Message:
हा नेमकं काय आहे आणि कशासाठी आलेला आहे याविषयी अनेक जणांच्या मनात गोंधळ निर्माण झालेला आहे परंतु या मेसेज विषयी चिंता करण्याचे काहीही कारण नाही, हा मेसेज देशभरातील सर्व भारतीयांच्या मोबाईलवर आज सकाळी म्हणजे 20 जुलै 2023 ला 10.20 च्या दरम्यान पाठवण्यात आलेला आहे.
हा मेसेज भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून अनेक मोबाईल वापरकर्त्यांना पाठवण्यात आलेला आहे. नागरिकांना आपत्कालीन वेळेत संदेश पाठवण्यासाठी भारत सरकार नवीन तंत्रज्ञान आणत आहे याची चाचणी घेण्यासाठी सर्व नागरिकांच्या मोबाईल वर हा अलर्ट मेसेज पाठवण्यात आलेले आलेला आहे.
एखाद्या विषयाची माहिती किंवा आपत्कालीन सेवेची माहिती नागरिकांना एकाच वेळी पाठवण्यासाठी हि नवीन अलर्ट यंत्रणा भारत सरकार कडून तयार करण्यात आलेली आहे. या यंत्रणेची चाचणी म्हणून आज सर्वांना हा अलर्ट मेसेज पाठवण्यात आला होता. भविष्यात आपत्कालीन वेळी या पद्धतीचा वापर करून सर्व नागरिकांना संदेश दिला जाणार आहे.
अलर्ट मेसेज चा फायदा
- सर्व स्मार्टफोन वापरकर्त्यांना एकाच वेळी आपत्कालीन परिस्थितीची माहिती मिळेल.
- यामध्ये भूकंपाचा इशारा तसेच चक्रीवादळ, सुनामी व इतर नैसर्गिक आपत्तीची माहिती दिली जाईल.
बऱ्याच नागरिकांना हा अलर्ट मेसेज इंग्रजीमध्ये तसेच मराठी मध्ये सुद्धा पाठवण्यात आला होता. आपत्कालीन संदेश बटनावर ओके केल्यास तुम्हाला आपत्कालीन अलर्ट पाहिजे आहेत का असे विचारण्यात आले होते यामध्ये हो किंवा नाही असे दोन पर्याय देण्यात आले होते.